मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

आठवणी भाग -२ ( मैत्रीण )

 मागील पानावरून -  आता मात्र मला बऱ्यापैकी इंग्लिश समजायला लागले होते. शिवाय माझी आणि त्या मुलीची चांगली गट्टी जमायला लागली होती.ती मुलगी बसणे अप्पर इंदिरा नगर येथून  दररोज क्लास करिता येत असे. येताना डब्यामध्ये थोड्या जास्तच चपाती भाजी घेऊन येत असे. मीही प्रायव्हेट मेस चा डब्बा लावलेला होता. आम्ही दोघे दुपारी झाडाखाली बसून जेवण करत असायचो. माझा डब्बा कधी यायचा कधी नाही यायचा, पण त्या मुलीने मला उपाशी राहू दिले नाही.तिच्या डब्यातील जेवण मला देत असे. आता आमची मैत्री खूपच मजबूत झाली होती.आमचा एकमेकावर खूप विश्वास होता. ती तिच्या मनातील सर्व गोष्टी मोकळ्या मनाने माझ्याशी शेअर करायची. ती मला स्टडी मध्येही मदत करायला लागली.जे मला समजत नव्हते,ती मला समजून सांगत असे. आता मात्र आमची मैत्री सर्वांच्या नजरेत यायली लागली होती. काहींना आमच्या मैत्रीने छातीत जळजळ व्हायला लागली होती, तर काहींना डोळ्यांचा त्रास होऊ लागला. काहींना तर त्यामुळे झोप लागेना. मी गावाकडून आलेला गरीब, जास्त ओळख नसलेला मुलगा या सुंदर मुलीचा एवढा जवळचा मित्र कसा झाला,  याचाच विचार इतर मुले करू लागली.                          

नवीनतम पोस्ट

आठवणी भाग - १ (ओळख)

सोचिये

सोचीये